विश्वशांती महायज्ञाला कोल्हापुरात विरोध वाढतोय

October 27, 2008 7:25 AM0 commentsViews: 2

27 ऑक्टोबर, कोल्हापूर – कोल्हपूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी 108 पद्म कुंडील विश्वशांती यज्ञ करण्यात येणार आहे. हा यज्ञ 2 ते 13 नोव्हेंबरदरम्यान शहरातील गांधी मैदानात होणार आहे. पण या विश्वशांती महायज्ञाला विरोध वाढू लागला आहे. शहरात यज्ञाविरोधी आंदोलनानं जोर धरला आहे. जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेनं गांधीगिरी पद्धतीनं विश्वशांती महायज्ञ विरोधीआंदोलन सुरू केलं आहे. जिथे हा विश्वशांती यज्ञ होणार आहे. त्याच गांधी मैदानात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या यज्ञामुळं जातीय तेढ निर्माण होईल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यज्ञ कार्यस्थळावरचं काम ताबडतोब थांबवलं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या भाषेत उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.'आमचा या आंदोलनाला पूर्ण विरोध आहे. आम्ही निषेध करतोय.अहिंसेच्या मार्गानं हा प्रश्न सुटला पाहिजे. आम्हाला त्रास होत आहे, म्हणून उपोषण करून आम्ही हे आंदोलन करतोय', असं जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे आबा कांबळे म्हणाले. ' कोल्हापुरात हा यज्ञाचा पसरा याठिकाणी निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे. हा खर्‍या अर्थानं वर्ग कलह निर्माण करणारा आहे. जातीवाद पसरवणारा तसंच वर्णद्वेष आणि जातीव्यवस्था पुर्नप्रस्थापित करणारा ब्राम्हणी डाव सुरू आहे', असं प्राचार्य व्ही.डी.माने म्हणाले. हा विरोध पाहता यज्ञ आता होतो तरी कसा, याकडे कोल्हापुरकरांचं लक्ष लागून राहिलंय.

close