बुकींनी साधला इरफानशीही संपर्क

September 17, 2010 12:17 PM0 commentsViews: 1

17 सप्टेंबर

सध्या स्पॉट फिक्सिंगची प्रकरणे गाजत आहेत. फिक्सिंग प्रकरणी सध्या तीन पाकिस्तानी खेळाडूंवर आयसीसी कारवाई कऱण्याची शक्यता आहे. आणि त्यांची चौकशीही सुरू आहे.

आता भारताचा फास्ट बॉलर इरफान पठाणनेही सनसनाटी आरोप केले आहेत. काही बुकीजनी आपल्यालाही संपर्क केला होता. त्यांनी आपल्याला महागडी गिफ्ट देण्याबाबत बोलणी केली होती.

पण आपण ठामपणे नकार दिल्याचे इरफानने म्हटले आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंनाही बुकीजनी संपर्क केल्याचे आता उघड झाले आहे.

close