ताकारीत मूकबधीर विद्यालय

September 17, 2010 12:33 PM0 commentsViews: 8

प्रताप नाईक, ताकारी, सांगली17 सप्टेंबर

अपंग – मूकबधीर शाळांना अनुदान देण्याचे राज्यसरकारने बंद केले आहे. पण ही मुले आपल्या या व्यंगावर मात करुन शाळेत जावीत यासाठी एक संस्था काम करत आहे.

सांगली जिल्ह्यातील ताकारीमधील, लोकनेते राजारामबापू पाटील निवासी मूक-बधीर शाळा हे काम करत आहे. या शाळेत चाळीस मूक-बधीर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

बहुतेकांचे आईवडील शेतमजूर आहेत. इकडे येण्याआधी, आपली मुले बोलू शकतात यावर त्यांचा विश्वास बसणे कठीण होते. या मुलांना सर्वसाधारण मुलांच्या शाळेत जाता यावे, म्हणून डॉ. अतुल आणि डॉ. राखी पाटील प्रयत्न करत आहेत.

या मुलांचे पोषण सर्वसामान्य मुलांसारखेच व्हावे, यावर संस्था भर देत आहे. सोनराज सेवाभावी संस्थेच्या या मूकबधीर शाळेला मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता.

शाळा निवासी असल्याने प्रत्येक मुलाला वर्षाकाठी अडीच लाख रुपये खर्च येतो. हा खर्च तुम्ही उचलू शकता. तसेच मेडिकल खर्चाची जबाबदारी घेऊ शकता.

संस्थेला श्रवणयंत्र आणि ऑडिओ मीटर यंत्रांची गरज आहे, त्याचा खर्च करु शकता.

त्यासाठी पत्ता आहे –

सोनराज सेवाभावी संस्था संचलित लोकनेते राजारामबापू पाटील निवासी मूकबधीर विद्यालय ताकारी,

तालुका वाळवा, जिल्हा सांगली.फोन नंबर – 02342-262136

तुम्ही चेक अथवा डीडी पाठवू शकता.

बँकऑफ इंडिया, ताकारी शाखा, जि. सांगलीअकाऊंट नंबर – 161310110000030

close