कडधान्यातून साकारला श्री गणेश

September 17, 2010 1:05 PM0 commentsViews: 11

17 सप्टेंबर

गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी आता अनेक मंडळे घेताना दिसत आहेत. असाच प्रयत्न कारंजाच्या बालहौशी गणेश मंडळाने केला आहे.

त्यांनी गणपती बाप्पा साकारला आहे, चक्क चक्क कडधान्यातून. सोबतच बळीराजाच्या या धान्याला योग्य भाव मिळावा आणि महागाई लवकरात लवकर कमी व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी बाप्पाकडे केली आहे.

मूग, मसूर, तूर, सोयाबीन, साबुदाणा, तांदूळ आणि मातीचा वापर करून ही मूर्ती साकारण्यात आली आहे.

close