टॅक्सी दिसणार नव्या रुपात

September 17, 2010 3:18 PM0 commentsViews: 1

17 सप्टेंबर

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेली टॅक्सी आता नव्या रुपात येण्याचे संकेत परिवहन विभागाने दिले आहेत.

पण त्यामुळे मुंबईतील टॅक्सीचा काळा पिवळा रंग आणि तिची ओळखच पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील टॅक्सीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता परिवहन विभागाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

नवी टॅक्सी कशी असेल, याबाबत परिवहन विभागाकडे विचारणा केली असता, तपकीरी, तांबूस आणि लालसर गुलाबी अशी वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत.

close