काश्मीरमध्ये देशाचा तुकडा पाडण्याचा डाव

September 17, 2010 3:37 PM0 commentsViews:

17 सप्टेंबर

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, भारताचे तुकडे करण्याचा काही देशविरोधी घटकांचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडण्यासाठी काश्मिरींच्या पाठीशा राहा, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केले.

सोमवारी काश्मीर दौर्‍यावर येणार्‍या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कोणाला भेटायचे हे स्वत: ठरवावे. काश्मीरसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. पण शेख अब्दुला कधीही घाबरले नाहीत.

फारुख अब्दुल्ला घाबरले नाही आणि आता ओमर अब्दुल्लाही घाबरणार नाहीत, असे फारुक अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितले.

हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली गिलानी यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नसल्याचेही फारुख अब्दुल्ला यावेळी म्हणाले.

close