उल्हासदादा पवार दिल्लीत

September 18, 2010 10:36 AM0 commentsViews: 4

18 सप्टेंबर

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. विलासराव समर्थक उल्हास पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी सोनिया गांधींची भेट घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी, उल्हास पवार यांनी माणिकराव ठाकरेंची तक्रार केल्याचे समजते. माणिकराव ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड होऊ नये, यासाठी काँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आपल्या विश्वासातील व्यक्तीला आणण्याचा विलासराव देशमुखांचा प्रयत्न आहे. तर अशोक चव्हाण यांचा माणिकराव ठाकरेंना पाठिंबा आहे.

close