मुंबईच्या बेस्ट बसमध्ये गोळीबार, हल्लेखोर ठार

October 27, 2008 7:46 AM0 commentsViews: 5

27 ऑक्टोबर, मुंबई मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसमध्ये गोळीबार झाला असून त्यात बसचा कंडक्टर जखमी झाला आहे. पोलिसांनी प्रत्युरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला आहे. बसमध्ये गोळीबार करणारा तरुण राज ठाकरे यांच्या हत्येसाठी आला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.कुर्ल्यातील बैल बाजार भागात बेस्ट बसमध्ये हा गोळीबार झाला. ही बस अंधेरीवरुन कुर्ल्याला जात होती. या गोळीबारात कंडक्टरसह तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. राहुल राज असं या हल्लेखोराचं नाव आहे. तो बिहारमधील पाटण्याचा रहिवासी होता. दोनच दिवसांपूर्वी तो मुंबईत आला होता. राज ठाकरेंना ठार मारण्यासाठी आलोय, असं तो बडबडत होता, अशी माहिती कंडक्टरनं दिली आहे. याबाबत त्याच्या वडिलाशीं संपर्क साधला असता, दोन दिवसांपूर्वी राहुलशी बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी ही बस आता ताब्यात घेतली आहे. या डबलडेकर बसमधले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं समजतंय.

close