हिमायत बेगच्या वकीलपत्रावरून वाद

September 18, 2010 10:46 AM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर

जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपी हिमायत बेगच्या वकीलपत्रावरून आता वाद सुरू झाला आहे. हिमायतचे वकीलपत्र स्विकारू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनने केले होते.

तर ऍडव्होकेट सुशील मंचरकर यांनी हिमायतचे वकीलपत्र घेणार असल्याचे जाहीर केले आहे. वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहन करण्याचा अधिकार बार असोसिएशनला नाही, अशी भूमिका मंचरकर यांनी मांडली.

तर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

close