नवेगाव अपघातग्रस्तांना मदत

September 18, 2010 11:36 AM0 commentsViews: 2

18 सप्टेंबर

गोंदिया नवेगाव अपघातातील, मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखांची मदत आता मुख्यमंत्री निधीतून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे.

गोंदिया- नागपूर हायवेवर दुधाचा टँकर आणि जीपचा अपघात होऊन काल 17 जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. कालच्या अपघाताच्या विरोधात, तिरोडा तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.

या अपघाताला पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेली अवैध वाहतूक जबाबदार असल्याचे आंदोलकांची म्हणणे आहे. आंदोलकांनी जागोजागी टायर पेटवले. तिरोडा सरकारी हॉस्पिटलजवळ जवळपास एक हजारांच्या वर लोक जमा झाले होते.

close