दबंगवर झंडू बामचा आक्षेप

September 18, 2010 11:58 AM0 commentsViews: 2

18 सप्टेंबर

सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग हा सिनेमा रिलीजनंतरही पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यातील झंडू बाम या शब्दामुळे झंडु बाम या कंपनीने या सिनामाचा निर्माता अरबाझ खानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

कंपनीच्या परवानगीशिवाय झंडू बाम या प्रोडक्टचे नाव 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यात वापरण्यात आले आहे. म्हणून हे गाणे सिनेमातून काढण्यात यावे, अशी नोटीस त्यांनी निर्माता अरबाझ खानला पाठवली आहे.

त्यामुळे अगोदरच चर्चेत असलेला दबंग हा सिनेमा या वादामुळे रिलीजनंतरही चर्चेत आला आहे.

close