पाक टीम फिक्सिंग वादात

September 18, 2010 12:04 PM0 commentsViews: 3

18 सप्टेंबर

पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या फिक्सिंगच्या वादात सापडली आहे. 'द सन' या ब्रिटीश टॅबलॉईडने आज पाक टीमबाबत आणखीन एक नवीन खुलासा केला आहे.

काल झालेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यानच्या मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या फिक्सिंगची चौकशी करण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सीलने अर्थातच आयसीसीने दिले आहेत.

या मॅचमधील दोन ओव्हर्स अगोदरच फिक्स झाल्या होत्या. आणि बुकीजना पाकिस्तानच्या इनिंगची माहिती मॅचअगोदरच मिळाली होती असा दावा 'द सन'ने केला आहे. दरम्यान पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इजाझ बट्ट यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

तर पाकिस्तानचे क्रिडामंत्री ऐयाज जाखरानी यांनी मात्र पाकिस्तान क्रिकेट व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आपण लवकरच पाकिस्तानच्या अध्यक्षांची भेट घेणार आहोत असेही ते म्हणालेत.

close