अयोध्यावासी वैतागले…

September 18, 2010 12:38 PM0 commentsViews: 6

18 सप्टेंबर

सागरिका घोष, अयोध्या

अखेर साठ वर्षांनंतर अलाहाबाद हायकोर्टात अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या मालकीचा निकाल लागणार आहे. पण गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या या वादामुळे अयोध्येतील सर्वसामान्य माणूस वैतागला आहे.

उत्तर प्रदेशातील मायावती सरकार कुठलाही धोका पत्करू इच्छीत नाही. आणि म्हणून पूर्ण अयोध्येला छावणीचे स्वरूप आले आहे. प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नित्याच्या या बंदोलबस्ताने येथील सामान्य माणूस हैराण झाला आहे.

येथील विद्यार्थ्यांच्या मते बाबरी मशीद रामजन्मभूमीचा वाद हा वेळेचा अपव्यय आहे.अयोध्येत एके काळी तापलेले भावनिक वातावरण आता निवळले असले तरी या वादामुळे निर्माण झालेली दुही आजही काही प्रमाणात जिवंत आहे.

आधुनिक भारताच्या नकाशातून अयोध्येचे नाव धूसर झाले असले तरी राजकीय नकाशावर हे नाव आजही आपले महत्त्व राखून आहे.

close