पंकजा पालवे अपघातात जखमी

September 18, 2010 12:42 PM0 commentsViews: 155

18 सप्टेंबर

भाजपचे लोकसभेतले विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मुली प्रीतम मते आणि आमदार पंकजा पालवे या अपघातात जखमी झाल्या आहेत.

शुक्रवारी रात्री मुंबईत पूर्णा बिल्डिंगसमोरच्या फुटपाथवर उभ्या असताना त्यांना एका मोटारसायकलने धडक दिली. त्यात प्रीतम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

आमदार पंकजा पालवे यांच्या खांद्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू आहेत.

close