हद्दीच्या वादात मृतदेह दुर्लक्षित

September 18, 2010 12:51 PM0 commentsViews: 6

18 सप्टेंबर

कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर एक मृतदेह काल 15 तास तसाच पडून होता.

स्कायवॉकवर काम करणार्‍या एका व्यक्तीने रेल्वे पोलिसांना या मृतदेहाची माहिती सकाळीच दिली होती. मात्र दोन्ही पोलिसांनी आपली हद्द नसल्याचे सांगत मृतदेहाकडे दुर्लक्ष केलं.

पोलिसांच्या खाकी वर्दीचा खाक्या माहीत असल्याने प्रवाशीही या मृतदेहाकडे पाहत पुढे जात होते. अखेर लोकांच्या दबावामुळे स्थानिक पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजता मृतदेह उचलला.

close