कोल्हापूर महापालिकेत गोंधळ

September 18, 2010 12:56 PM0 commentsViews:

18 सप्टेंबर

कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज गोंधळ झाला. कसबा बावडा इथे 1 कोटी 27 लाख रुपयांच्या निधीतून 20 लाख लीटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू होते. पण हे काम प्रशासनाने अचानक बंद पाडले.

त्याचबरोबर या कामाची फेरनिविदा काढली. काम बंद का केले आहे का, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. पण प्रशासनाकडून योग्य उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी गोंधळ घातला. यावेळी नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्तांना धारेवर धरले.

आयुक्त विजय सिंघल यांनी निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरु होईल, असे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवक शांत झाले.

close