नवी मुंबई एअरपोर्ट त्याच ठिकाणी होणार

September 18, 2010 1:02 PM0 commentsViews: 4

18 सप्टेंबर

नवी मुंबई एअरपोर्ट नियोजित ठिकाणीच होणार, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

पर्यावरण मंत्रालयाच्या काही हरकती आहेत, त्यावर तोडगा निघू शकतो. पण त्यासाठी एअरपोर्टची जागा बदलता येणार नाही, असं पटेल यांनी सांगितले आहे.

येत्या 22 सप्टेंबरला केंद्रीय पर्यावरण समितीची बैठक होणार आहे. त्यात सिडकोने तयार केलेला सुधारीत आराखडा सादर केला जाणार आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनांवर विचार करायला सिडकोला सांगण्यात आले आहे.

पण एअरपोर्टसाठी पर्यायी जागेचा विचार अशक्य असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

close