मुळा-प्रवरात गैरव्यवहार नसल्याचा निष्कर्ष

September 18, 2010 5:30 PM0 commentsViews: 5

18 सप्टेंबर

मुळा-प्रवरा वीज सोसायटीच्या आर्थिक व्यवस्थापनात गैरव्यवहार नाही, असा निष्कर्ष हैदराबादच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने काढला आहे. महावितरण कंपनीची सुमारे दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी मुळा-प्रवरा सोसायटीकडे आहे.

त्या संदर्भातील चौकशीचा अहवाल नुकताच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने राज्य वीज नियामक आयोग अर्थात एमईआरसीला दिला.

मुळा-प्रवराकडे असलेल्या संपूर्ण थकबाकीचे व्याज आणि विलंब शुल्काचे 650 कोटी रुपये `महावितरण'ने माफ करावेत. तसेच थकबाकीचे उर्वरित 1 हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नेमके सूत्र ठरवावे, अशी शिफारस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजने एमईआरसीला केली आहे.

थकबाकीच्या मुद्द्यावरून मुळा-प्रवाराचा वीज परवाना रद्द करण्याची मागणी महावितरण कंपनीने एमईआरसीकडे केली होती. त्यानंतर एमईआरसीने चौकशी लावली होती. चौकशी अहवालानंतर आता एमईआरसी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

close