इंदोरमधील गणेशोत्सवाचे 80 वे वर्ष

September 18, 2010 5:37 PM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर

इंदोरमधील तोफखाना रोडवरील सर्व मराठी लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. या गणेशोत्सवाचे हे 80 वे वर्ष आहे.

या गणपती मंडळाची मूर्ती दरवर्षी सव्वा फुटाची असते. ही मूर्ती पिवळ्या मातीपासून बनवली जाते. नैसर्गिक रंगांनी ही मूर्ती रंगवली जाते.

दहा दिवस या मूर्तीची आराधना करतात. गणेशोत्सवातील पहिल्या रविवारी गणपती अर्थवशीर्ष हवन केले जाते.

दहाव्या दिवशी मंडळातील टाकीमध्ये विसर्जन केले जाते आणि त्या मातीचा वापर झाडांसाठी केला जातो.

close