डोंबिवलीत ‘सेव्ह द टायगर’ देखावा

September 18, 2010 5:49 PM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर

"वन्यजीव वाचवा " ही प्राणी मित्रांची मागणी आता चांगलीच जोर धरू लागली आहे.

याच शीर्षकाखाली डोंबिवलीत एकता गणेशोत्सव मित्र मंडळाने या वर्षी "सेव्ह द टायगर" देखावा साकारला आहे.

वाघासोबतच इतरही वन्यजीव प्राण्यांच्या जाती लुप्त होत चालल्यात, याला मानवच जबाबदार आहे. आणि या प्राण्यांचे जीव मानवच वाचवू शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे.

त्याचबरोबर इकोफ्रेंडली गणपतीचा नियम पाळत जंगलाचा साकारलेला देखावा आणि गणेशाची मूर्ती हीदेखील कागदापासून बनवण्यात आली आहे.

close