रांगोळीतून 111 गणेशांचे दर्शन

September 18, 2010 5:59 PM0 commentsViews: 7

18 सप्टेंबर

जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात श्रीगणेशाच्या 111 रुपांच्या रांगोळीचे प्रदर्शन भरले आहे.

रांगोळी कलाकार रेखा वैद्य यांनी रेखाटलेल्या या प्रदर्शनात एकाच ठिकाणी गणेशाच्या विविध रुपांचे दर्शन भाविकांना होत आहे.

अष्टविनायक, सिध्दीविनायक, लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई या गणेशाच्या प्रख्यात रुपांसह राशींचे 12 गणपती हे या रांगोळी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

रांगोळी साकारण्यासाठी रेखा वैद्य यांनी भांडी, फुले, धान्य, पीठ यांचाही उपयोग केला आहे.

close