हिंमत असेल तर सिमीच्या कार्यालयावर हल्ले करा- उद्धव ठाकरे

October 27, 2008 11:17 AM0 commentsViews: 4

27 ऑक्टोबर, मुंबईशिवसेना नेते मनोहर जोशी यांनी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला झालेली अटक अयोग्य आहे, असं म्हटलं होतं तर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सरळसरळ राष्ट्रवादीलाच आव्हान दिलंय. हिंमत असेल तर आता सिमीच्या कार्यालयावरही हल्ला करा, असं आव्हान त्यांनी दिलं. डोंबिवलीत सीकेपी बँकेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ' सरकारला अतिरेकर्‍यांचे अड्डे माहीत आहेत. तिथे हल्ले करा. नाशिकमधील विहिंपच्या कार्यालयावर राष्ट्रवादीनं केलेल्या हल्ल्यात शिवरायांचा पुतळा पाडला गेला. हिंमत असेल तर सिमीच्या कार्यालयावर हल्ले करा ', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

close