सोलापूरात दामाजी सहकारी साखर कारखाना संकटात

September 19, 2010 12:55 PM0 commentsViews: 7

19 सप्टेंबर

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातला दामाजी सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक संकटात आहे.

पण या कारखान्यातील चार हजार मेट्रीकटन मळी ओढ्यात वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही मळी वाहून गेल्याचा आरोप होत आहे. अडीच कोटींची ही मळी टाक्यांमध्ये योग्य पध्दतीने साठवण्यात आली नाही.

टाक्यांमधून मळी ओढ्यात गेल्याने पाणीही प्रदुषीत झाले आहे. तहसिलदार आणि इतर अधिकार्‍यांनी ओढ्याची पाहणी करून गावकर्‍यांनी पाणी पिऊ नये अशी सूचना केली.

कारखाना सध्या आर्थिक संकटातून जात असताना व्यवस्थापन एवढा निष्काळजीपणा कसा दाखवू शकते असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

close