लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 11 किलोमीटरपर्यंत रांगा

September 19, 2010 1:00 PM0 commentsViews: 1

19 सप्टेंबर

गौरी विसर्जन आणि सात दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता गणेशभक्त बाप्पांच्या दर्शनासाठी रस्ते फुलु लागले आहे.

आणि त्यातच आज रविवार असल्याने मुंबईत लालबागच्या राजाला तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.

आज लालाबागच्या राजाला गडद गुलाबी रंगाचे कद नेसवले गेले आहे. आज गणेशोत्वसाचा शेवटचा रविवार असल्यामुळे नवसाची रांग 11 किलोमीटरपर्यंत पोहोचली तर मुखदर्शनासाठीची रांग 7 किलोमीटर लांब आहे.

तर पुण्यातही तासन तास रांगेत उभे राहून भाविक दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आहे

close