महिला बॉक्सर मेरी कॉमने रचला इतिहास

September 19, 2010 4:59 PM0 commentsViews: 5

19 सप्टेंबर

भारताची महिला बॉक्सर मेरी कॉमने इतिहास रचला आहे. बार्बाडोस इथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन शिपमध्ये तिने गोल्ड जिंकले आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधलं हे तिचे पाचवे गोल्ड आहे. आणि असा पराक्रम करणारी ती एकमेव बॉक्सर आहे.

बॉक्सिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याचा हल्ला तुम्हाला थोपवायचा असतो. आणि त्याचवेळी तुम्ही आक्रमक होऊन प्रतिस्पर्ध्याला ठोसेलगावायचे असतात.

तुमचे जितके शॉट्स अचूक बसतात तेवढे पॉइंट्स तुम्हाला मिळतात. बॉक्सिगमधल्या याच आव्हानामुळे मॅरीकॉम या खेळाकडे वळली असावी. कारण, वैयक्तीक आयुष्यातही मेरीकॉम अशाच आव्हानांना सामोरं जात वर आली.

प्रत्येक नव्या आव्हानामुळे तिच्यातली आक्रमकता उफाळून येते. आणि हे तिने एक दोनदा नाही तर तब्बल पाचदा सिद्ध केले.

2001मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला लागल्यापासून मेरीकॉमची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली. महिला बॉक्सिंगमध्ये मेरी कॉम इतकी आक्रमक बॉक्सर सध्याच्या घडीला तरी कोणी नाही.

आत्मविश्वास आणि आव्हान झेलण्याची तयारी याच्या जोरावर तिने हा प्रवास केला. 2006नंतर घरगुती कारणामुळे ती बॉक्सिंगपासून दूर गेली होती.

पण जुळ्या मुलांच्या जन्मानंतर 2008मध्ये तिने पुन्हा कमबॅक केले. आणि त्यावर्षीची वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून कमबॅक यशस्वीही केले. आता तिच्या कारकीर्दीला जोड मिळाली ती पाचव्या विजेतेपदाची होय.

close