जम्मू- काश्मीरमध्ये एसएमएस बंदी कायम

October 27, 2008 11:19 AM0 commentsViews: 4

27 ऑक्टोबर, जम्मू काश्मीर _ दिवाळीची धूम सुरू झाली आहे. पारंपारिक पद्धतीनं दिवाळी साजरी करताना त्यात आधुनिक साधनांचीही मदत होते. शुभेच्छा देण्यासाठी आता सगळ्यात जास्त उपयोग होतो तो एसएमएसचा. पण जम्मू काश्मीरमधील नागरिक एसएमएसचा वापर करू शकणार नाहीत. अमरनाथ जमीन प्रकरणानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये एसएमएसवर बंदी घालण्यात आली होती. ती अजुनही कायम आहे. या बंदीवर कार्टुनिस्ट मनोज चोप्रा यांनी आपल्या कार्टुन्सच्या माध्यमातून टीका केलीये.अमरनाथ जमीन प्रकरणानंतर उसळलेल्या दंगलीत एसएमएसच्या माध्यमातून तेल ओतण्याचं काम करण्यात आल्याचा ठपका ठेवत एसएमएस सेवेवर बंदी घालण्यात आली होती. तीन महिन्यानंतरही ही बंदी कायम आहे. 'एसएमएसवर बंदी आणणं पूर्णत: चुकीचं आहे. कारण हा शेवटी जम्मू काश्मीरच्या लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे', असं कार्टुनिस्ट मनोज चोप्रा एसएमएस बंदीविषयी बोलताना म्हणाले. एसएमएस बंदीची सर्वात जास्त झळ जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण त्यांना एसएमएसची इतकी सवय झालीय की, एसएमएसशिवाय जगणं म्हणजे श्वास हरवल्यासारखं वाटतंय. सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवण्याचे आदेश दिले असले तरी राज्यसरकारनं ही बंदी उठवली नसल्याचं ऑपरेटर्स सांगत आहेत. 'उत्सवांच्या काळात तरी ही बंदी उठवली जावी. याकाळात मोबाईलवरून 60 ते 70 टक्के जास्त एसएमएस केले जातात', असं बीएसएनएलचे महाव्यवस्थापक ए.के. मित्तल यांचं म्हणणं आहे.

close