कोल्हापुरात पाण्यासाठी आंदोलन

September 20, 2010 9:27 AM0 commentsViews: 4

20 सप्टेंबर

कोल्हापूर शहर आणि उपनगरात आजही पाणी टंचाई कायम आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी आज कोल्हापूर शहरातील महावीर कॉलेजच्या समोर रास्ता रोको आंदोलन केले.

संतापलेल्या महिलांनी हातात घागरी आणि कळशा घेऊन हे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या महिलांनी महापालिकेचे आयुक्त, महापौर आणि भागातील नगरसेवक यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती. पण अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही.

त्यामुळे त्यांनी आज दसरा चौक ते बावडा हा रस्ता दोन तासांहून अधिक काळ अडवून धरला. महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत केला नाही, तर महागरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला.

close