उत्तराखंडमध्ये पावसाचे 60 बळी

September 20, 2010 9:33 AM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.

सरकारने संपूर्ण राज्यात हायअलर्ट घोषित केला आहे. तर केंद्राने उत्तराखंडला आपद्ग्रस्त राज्य घोषित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

रुरकी, अलमोरा आणि रामनगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवानांनी बचाव कार्य सुरू केलेआहे. कित्येक गावे पाण्याखाली बुडाली आहेत.

हरिद्वारमध्ये गंगेबरोबरच कित्येक नद्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने पुढचे 24 तास पाऊस सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

close