सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल

September 20, 2010 10:23 AM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्तवाखाली 38 सदस्यांचा यात समावेश आहे.

या भेटीदरम्यान श्रीनगर आणि जम्मूमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. हे शिष्टमंडळ दोन दिवस जम्मू काश्मिरच्या दौर्‍यावर असणार आहे.

काश्मीरमधील हिंसाचार थांबवण्यात त्यांना यश येईल, असा शिष्टमंडळातील सदस्यांना विश्वास आहे. गेल्या 3 महिन्यांतील हिंसाचारात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

या आठवड्यात काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भात कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यावेळी सदस्यांच्या काश्मीरबद्दलच्या सूचनांचा विचार केला जाईल. दरम्यान सर्वपक्षीय शिष्टमंडळाला काश्मीरमधील फुटीरवाद्यांनी विरोध केला आहे.

close