मध्य प्रदेशात रेल्वे अपघात; 20 ठार, 50 जखमी

September 20, 2010 10:26 AM0 commentsViews: 112

20 सप्टेंबर

मध्य प्रदेशमध्ये मुना आणि शिवपुरी स्टेशनदरम्यान दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. अपघातात 20 ठार तर 50 प्रवासी जखमी झालेत.

मुना आणि शिवपूर स्टेशनदरम्यान मालगाडी आणि इंटरसिटी रेल्वेंमध्ये हा अपघात झाला. ही इंटरसिटी रेल्वे इंदोरहून-ग्वालेरकडे जात होती.

पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान आता केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख, गंभीर जखमींना 1 लाख. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

रेल्वे राज्यमंत्री मुनीयाप्पासुद्धा घटनास्थळी दाखल झाले

close