बिलाल आणि बेग आज कोर्टात

September 20, 2010 10:30 AM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात अटक केलेल्या बिलाल आणि हिमायत बेग यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज नाशिक कोर्टात बिलालला तर पुणे कोर्टात हिमायत बेगला हजर करण्यात येणार आहे.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एटीएसने या दोन जणांना अटक केली आहे. हिमायत बेग हा या स्फोटांचा मास्टर माईंड आहे, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली होती.

उदगीरमध्ये स्फोटांचा कट रचण्यात आला. यासंबंधीची बैठक ही उदगीरमध्ये झाली होती. आणि मोहसीन चौधरी, हिमायत बेग आणि बिलाल हे या बैठकीला उपस्थित होते.

तिथल्या ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये हा बाँब बनवण्यात आला होता. हिमायत बेगने 31 जानेवारीला जर्मन बेकरीची पाहणी केली होती.

3 फेब्रुवारीला त्यांच्यात पुन्हा एकदा बैठक झाली. हिमायत बेगला पुण्यातील महात्मा गांधी बस स्टॉपवरुन अटक करण्यात आली. बेग हा 2006 मध्ये औरंगाबादमध्ये पकडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातही सहभागी होता.

close