ठाण्यातील नेत्यांची रस्त्यांकडे डोळेझाक

September 20, 2010 10:37 AM0 commentsViews: 4

विनय म्हात्रे, ठाणे

20 सप्टेंबर

ठाणे जिल्ह्यात तब्बल 14 टोलनाके आहेत. तर जिल्ह्यात एकूण 24 आमदार आहेत. नेत्यांची मांदियाळी असलेला जिल्हा अशी ठाण्याची ओळख आहे. पण ते किती नेतृत्त्वहीन आहेत, हे इथे उभारलेल्या टोलनाक्यांवरुन लक्षात येते.

गणेश नाईक, राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, वसंत डावखरे, सर्वपक्षांशी मित्रत्व असणारे नेते आणि विधानपरिषदेचे उपसभापती, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार एकनाथ शिंदे नेहमीच निवडणुकांमधील बेरजेच्या गणितात मास्टर माईंड समजले जाणारे, आमदार प्रताप सरनाईक शिवसेनेचे उद्योगपती नेतृत्त्व, आमदार संजय केळकर, यांच्यासह अनेक नेते जिल्ह्यात आहेत.

यांच्यासमोरच निकृष्ट दर्जाचे रस्ते बनले आणि त्यावर टोलही आकारला जाऊ लागला. पण या नेत्यांच्या नेतृत्त्वाची धार आता बोथट झाल्याचे दिसत आहे.

ठाणे शहरालगतच पाच टोलनाके आहेत. या टोलचा भुर्दंड मुंबईकरांपेक्षा कितीतरी पटीने ठाणेकरांनाच सोसावा लागत आहे. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे मोठे नेतृत्त्व आहे.

पाणी, रस्ते, लोडशेडिंग, अनधिकृत घरे, ट्राफिक अशा जीवन मरणाच्या समस्यांशी ठाणेकर रोेजच झगडतो. पण नेते मात्र आपल्या प्रसिद्धीच्या झोतात मग्न आहेत.

close