रत्नागिरीत दलित वस्तीचे पाण्याविना हाल

September 20, 2010 10:43 AM0 commentsViews: 3

20 सप्टेंबर

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील धामणपे गावातील दलितवस्तीला गेल्या पाच वर्षांपासून बसत आहे.

26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीत या वस्तीतील एकमेव सार्वजनिक विहिर कोसळली आणि ती अद्याप या वस्तीला बांधून मिळालेली नाही.

त्यामुळे गेली पाच वर्ष येथील माणसे नावेरे नदीचे दूषित पाणी वापरत आहेत. याला कंटाळून काही घरातील माणसे घरे सोडून मुंबईला नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाली आहेत.

तर दूषित पाणी वापरल्याने लहान मुलांमध्ये आजारचे प्रमाणही वाढत आहे. आत्तापर्यंत येथील गावकर्‍यांनी ग्रामपंचायतीपासून पंचायतसमितीपर्यंत अनेक वेळा दाद मागितली.

लोकप्रतिनिधींकडेही गार्‍हाणे घातली. पण एक साधी विहीर इथे उपलब्ध करून देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे.

धामणपे ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असून पाणी मिळाले नाही तर अखेर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय या दलीत वस्तीने घेतला आहे.

close