बाप्पा खेळतायत ठाण्यात क्रिकेट

September 20, 2010 10:59 AM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

ठाण्याच्या राबोडी परिसरात राहणार्‍या एका भक्ताने चक्क गणेशालाच क्रिकेट खेळतानाचा देखावा साकारला आहे. भारतात क्रिकेटला देव मानले जाते.

इथे तर चक्क देवालाच क्रिकेट खेळताना या देखाव्यात दाखवले आहे. हा देखावा ठाण्याचे आकर्षण केंद्र बनला आहे.

व्यवसायाने इंटीरिअर डेकोरेटर असणार्‍या दिलीप वैती यांच्या कल्पनेतून हा देखावा साकारला आहे. काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात वैती यांनी गणेशाची 11 रूपे चक्क क्रिकेट मॅच खेळताना दाखवली आहेत.

इथे श्री गणेशच बॅटस्‌मन, बॉलर, फिल्डर आणि अंपायरही बनला आहे.

close