भारतीय टीमची निवड

September 20, 2010 11:07 AM0 commentsViews: 7

20 सप्टेंबर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या दोन टेस्ट मॅचसाठी आज भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. आणि अपेक्षेप्रमाणेच युवराज सिंगला या टीममधून वगळण्यात आले आहे.

युवराजऐवजी चेतेश्वर पुजाराचा 15 जणांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. टीममध्ये झहीर खान, हरभजन सिंग आणि गौतम गंभीरने पुनरागमन केले आहे.

दुखापतीमुळे झहीर खान आणि गौतम गंभीर श्रीलंका दौर्‍याला मुकले होते. पण आता दोघेही पूर्णपणे फिट झाले आहेत. टीममध्ये एस श्रीसंतला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट येत्या 1 ऑक्टोबरला मोहालीत खेळवली जाईल.

close