रेल्वे अपघातातील मृतदेह ठाणे स्टेशनवर पडून

September 20, 2010 11:26 AM0 commentsViews: 4

20 सप्टेंबर

रेल्वे अपघाताच्या घटना मुंबईकरांना नवीन नाहीत. पण गेल्या 41 तासांपासून एक मृतदेह ठाणे स्टेशनवर पडून आहे.

शनिवारी रेल्वे अपघातात एका 30 ते 35 वर्षांच्या तरुणाला ट्रेनने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टेमसाठी हा मृतदेह ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पण जागा नसल्याचे कारण पुढे करत हा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.

कळव्यातून सायन हॉस्पिटल अणि तिथून पुन्हा ठाणे स्थानकात हा मृतदेह पाठवण्यात आला. त्यामुळे आता या मृतदेहाला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

close