शहरी कुपोषणावर काम करणारी ‘सलाह’

September 20, 2010 11:46 AM0 commentsViews: 13

शची मराठे, मुंबई

20 सप्टेंबर

चौरस आहार आणि मूलभूत शिक्षण हा सगळ्याच बालकांचा हक्क. पण समाजातील सर्व स्तरांमध्ये या सुविधा पोहचल्या नाहीत. सलाह ही संस्था 1999 पासून मुंबई, ठाणे, रायगडमधील गरीब वस्त्यांमधील कुपोषणाच्या प्रश्नांवर काम करत आहे.

मोठ्या शहराच्या गरजा भागवणार्‍या कष्टकर्‍यांच्या मुलांसाठी संस्था काम करते. कचरा वेचणारे, बांधकामांवर काम करणार्‍या मजुरांच्या मुलांना ही संस्था मदत करते.

2005 च्या पुरानंतर या गरीब वस्त्यांमध्ये एक सर्व्हे केला गेला होता. तेव्हा 250 मुले कुपोषित होती. 75 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांची हालत इतकी वाईट होती, की त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले.

एकात्मिक बाल विकास योजना आहे, पण ती सुस्तावली आहे. जिथे खरोखर गरज आहे, तिथे अंगणवाड्या सुरू झालेल्या नाहीत.

ग्रामीण भागासारखेच शहरी भागातही कुपोषण होते, हे शहरी वास्तव सलाहने 4 वर्षांपूर्वी जनतेसमोर आणले. स्थलांतर होण्याचे दुष्परिणाम भोगणारी ही नवी पिढी सुदृढ करण्याचे आव्हान ते आता पेलत आहेत.

सलाह या मुलांच्या कुपोषणावर काम करणार्‍या संस्थेला तुम्हीही मदत करु शकता. ही मदत आर्थिक स्वरुपात, बालवर्ग चालवण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे, धान्य या स्वरुपात देऊ शकता.

कार्यकर्ते किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्चही तुम्ही उचलू शकता.

मदत पाठवण्याचा पत्ता –

सलाह संस्था बी. जी. तिवारी चाळ, मुरारबाग,सुभाष चौक, कल्याण-मुरबाड रोडकल्याण (प.)फोन नं. 0251 6572447, 9869110578 ई-मेल – salah.action@yahoo.co.in

close