सुरेल मैफल….. मुंबईच्या रवींद्र नाट्यगृहातली

October 27, 2008 11:35 AM0 commentsViews: 5

27 ऑक्टोबर, मुंबई – नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान आटोपून फराळाबरोबरच गेल्या काही वर्षांत रसिकांना मेजवानी मिळतेय ती सुरेल अशा दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांची. मुंबईच्या रवींद्र नाट्यगृहात अशीच एक सुरेल मैफल जमली होती. या कार्यक्रमाची सुरुवातच अस्सल मराठमोळ्या वातावरणात झाली. रसिकांचं स्वागत शहनाई वादनानं करण्यात आलंआणि सुंदर अशा रंगांनी सजवलेल्या रांगोळीनं यानंतर झांज पथकाच्या तालावर नृत्य सादर झालं आणि पहाटेची ही मैफल उत्तरोत्तर रंगत जाणार, याची खात्री रसिक प्रेक्षकांना सुरुवातीलाच पटली.

close