तृतीय पंथीयांना जीवे मारण्याची धमकी

September 20, 2010 12:11 PM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

पैसे दिले नाही तर मुंबईत व्यवसाय करु देणार नाही आणि व्यवसाय केला तर ठार मारू, अशी धमकी मुंबईतील सलीम नावाच्या तृतीयपंथीयाने दिल्याचा आरोप 10 तृतीयपंथीयांनी केला आहे.

हे सगळेजण अज्ञातस्थळी लपून बसले आहेत. त्याचबरोबर आपल्या मनाविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास सलीम प्रवृत्त करतो तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करतो, असाही आरोप या तृतीयपंथीयांनी केला आहे.

यासंबंधी ते लवकरच मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाल यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

close