गोळीबार स्थानिकांनीच केल्याचा पोलिसांचा दावा

September 20, 2010 1:50 PM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

दिल्लीतील जामा मशिदीच्या बाहेर रविवारी झालेला गोळीबार हा स्थानिक लोकांनीच केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. संवेदनशील भागात तणाव निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पण गोळीबारानंतर काही तासांतच पोलीस स्टेशनच्या जवळच एका कारने पेट घेतला. त्या कारमध्ये प्रेशर कुकर, वायरी, टायमर्स आणि अमोनियम नायट्रेट आढळलेत. हल्ल्यात डिटोनेटरचा वापर झाला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी अजून कुणालाही अटक झालेली नाही. मुंबईहून एक ई-मेल पाठवून या हल्ल्याची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीनने घेतली आहे. पण पोलिसांनी मात्र हा अतिरेकी हल्ला असल्याचे अमान्य केले आहे.

कॉमनवेल्थ गेम्सला अवघे दोन आठवडे असतानाच ही घटना घडली आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारतात आलेल्या आपल्या नागरिकांसाठी ऍडव्हायजरी जारी केली आहे.

close