प्रवेश परीक्षेला वकिलांचा विरोध

September 20, 2010 1:56 PM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

ऑल इंडिया बार कौन्सिलने वकिलांना प्रॅक्टिस करण्याआधी बार कौन्सिलची प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. त्याविरोधात नवोदित वकील मंचातर्फे आज पुण्यात निषेध सभा घेण्यात आली.

पुण्यातील कोर्टासमोर या वकिलीच्या पदवीधरांनी बार कौन्सिलचा निषेध केला. वकिलीची सनद मिळाल्यानंतरही प्रॅक्टिस करण्यासाठी वकिलांना ही परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी मिळाल्यापासून ते डिसेंबरपर्यंत सहा महिन्यांचा काळ वाया जाणर आहे, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे.

याबरोबरच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून 1300 रुपयेही आकारले जात आहेत. एकदा विद्यापीठाची परीक्षा घेतल्यानंतर पुन्हा ही नवी परीक्षा कशासाठी, असा प्रश्न विद्यार्थ्यांतर्फे उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलतर्फेही या परीक्षेला विरोध करण्यात आला आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात बार कौन्सिलच्या निर्णयाविरोधात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे.

close