अवयवदान जनजागृती देखावा

September 20, 2010 1:57 PM0 commentsViews: 14

नम्रता भिंगार्डे, मुंबई

20 सप्टेंबर

जोगेश्वरीतील दुर्गानगर गणेशमंडळाने एक हटके विषय देखाव्यासाठी निवडला आहे. ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयव दान या विषयावर त्यांनी जनजागृती करणारा देखावा सादर केला आहे.

दान महान या विचाराने प्रेरित झालेल्या दुर्गानगर गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दोन महिने खूप तयारी केली.

या उपक्रमामुळे अवयव दानाबद्दल जनजागृती होईल आणि लोकांचा अवयव दानाबद्दलचा दृष्टिकोन बदलायला मदत होईल, असा विश्वास मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

अवयव दानाबद्दलची माहिती मिऴवण्यासाठी जगभर प्रवास करणार्‍या स्टीफन आणि पॉल यांनाही दुर्गानगर गणेशमंडळाच्या या देखाव्याची माहिती मिळाली आणि ते मुंबईत दाखल झाले.

अवयव दानावर विविध देशांमध्ये कोणते उपक्रम राबवले जातात, यावर स्टीफन आणि पॉल यांची टीम एक डॉक्युमेंटरी बनवत आहे. आता मुंबईतल्या गणपतीचा आशीर्वाद घेउन ते जगभरात अवयव दानाचा प्रचार करणार आहेत.

close