कास पठारावरील पर्यटनाला आक्षेप

September 20, 2010 2:03 PM0 commentsViews: 102

20 सप्टेंबर

कास पठार व्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे हजारो पर्यटक येतात. या वाढलेल्या पर्यटनाचा फटका येथील जैवविविधतेला बसतो आहे, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.

कास पठार पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी गुंतवणूकदारांची परिषद लवकरच होणार आहे. या माहितीनंतर सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या पर्यावरणवाद्यांनी विकासाला विरोध दर्शवला आहे.

या विरोधासंदर्भात पर्यटन विकास महामंडळातील तज्ज्ञांकडून पर्यावरणवाद्यांची मते जाणून घेण्याचे काम सुरू आहे. कासचे पठार वनविभागाच्या ताब्यात असल्याने त्या ठिकाणी काय करायचे हे वनखाते ठरवील, असे विधान राज्याच्या वनमंत्र्यांनी केले.

तर हा पूर्ण पट्टा नॅचरल वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषीत करावा, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.

close