राजकीय नेत्यांना नोटीसा…

September 20, 2010 3:56 PM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

सर्व देशाला 24 सप्टेंबर रोजी लागणार्‍या अयोध्या निकालाचे वेध लागले आहेत. निकालानंतर कोणीही प्रक्षोभक वातावरण तयार करू नये, यासाठी सरकारकडून आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात झाली आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत. कलम 149 नुसार या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

प्रक्षोभक भाषणे करू नयेत, तसेच शांतता भंग होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याची ताकीद या नोटीशीत देण्यात आली आहे.

भुजबळांचे आवाहन

24 सप्टेंबरच्या निकालानंतर शांतता राखण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सर्व पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी 28 सप्टेंबरपर्यंत आपापल्या विभागातच राहून शांतता राखावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये वेगवेगळ्या बैठका घेतल्या. यात त्यांनी सर्व धर्माच्या नेत्यांची भेट घेतली.

शांतता भंग करणारे एसएमएस पाठवणार्‍यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचेही यावेळी भुजबळ म्हणाले.

close