अयोध्येबाबत न्यायाधीशांमध्ये मतभेद

September 20, 2010 4:05 PM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या निकालाला अवघे चारच दिवस राहिले आहेत. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात हा निकाल लागणार आहे.

पण या खटल्यातील तीन न्यायाधीशांमध्येच मतभेद निर्माण झालेत. चर्चेच्या मार्गातूनच या वादावर तोडगा निघावा, असे न्यायमूर्ती शर्मा यांचे मत आहे. खटला लांबणीवर टाकण्याच्या याचिका कोर्टाने फेटाळल्या होत्या.

त्यावेळी आपल्याशी चर्चा झाली नव्हती, असा दावा त्यांनी केला आहे. माझ्याशी चर्चा झाली असती, तर मी माझे मत सांगितले असते, असे म्हणून त्यांनी नवा वाद निर्माण केला आहे.

अयोध्येचा वाद हा एक दीर्घकाळ चाललेला कायदेशीर वाद आहे. नेमका हा वाद काय आहे..यावर एक नजर टाकूया..

भारतातला हा सर्वाधिक काळ चाललेला कायदेशीर वाद…याला बाबरीचा वाद म्हणा किंवा राममंदिराचा…पण प्रकरण अजूनही तापलेलेच आहे… अयोध्येतील ही 60 बाय 40 चौरस फुटांची जमीन कुणाला मिळणारयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच जमिनीवर 6 डिसेंबर 1992 पर्यंत बाबरी मशीद उभी होती.

- हा वाद 1885 पर्यंत मागे जातो…बाबरी मशीद म्हणून ओळखल्या जाणार्‍या जागेतील रामलल्लाची प्रार्थना करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका निर्मोही आखाड्याच्या प्रमुखांनी कोर्टात पहिल्यांदा दाखल केली.

अशी परवानगी कधीच देण्यात आली नाही. पण त्यानंतर 1886 मध्ये फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी निकाल दिला. त्यांनी म्हटलं "हे खूपच दुदैर्वी आहे, जी जागा हिंदूंचे श्रद्धास्थान होती, त्या जागेवर मशीद बांधली गेली. पण ही घटना 356 वर्षांपूर्वी घडली. त्यामुळे चूक सुधारायला अतिशय उशीर झाला आहे.

त्यानंतर 1950 पासून अलाहाबाद हायकोर्टात 5 याचिका दाखल झाल्या. त्यापैकी 4 हिंदूंच्या बाजूने, तर एक याचिका सुन्नी वक्फ बोर्डाच्या बाजूने दाखल झाली. बाबरी मशिदीच्या जागेवर या सर्वांनीच दावा केला.

- मीर बाकीने 1528 मध्ये बाबरी मशीद बांधण्यापूर्वी वादग्रस्त जमिनीवर मंदिर होते का?

- अयोध्या खरेच भगवान रामाचे जन्मस्थान आहे का? आणि या जागी हिंदू खूप पूर्वीपासून पूजा करतात, याचे काही पुरावे आहेत का?

- 1934 मध्ये मुस्लिमांनी मशिदीचा प्रार्थनेसाठी वापर करणे सोडून दिले का?

- रामलल्लाच्या मूर्ती बाबरी मशिदीत आढळणे हा खरोखरच एक चमत्कार होता का?

अयोध्येतील वादाला आणखी एक कायदेशीर बाजू आहे. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह संघ परिवारच्या अनेक नेत्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. 24 सप्टेंबरला एकदा का या खटल्याचा दिवाणी निकाल लागला की मग खटल्याची गुन्हेगारी प्रक्रियाही वेग घेण्याची शक्यता आहे.

close