प्रक्षोभक विचारांची पेरणी सुरू

September 20, 2010 4:23 PM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

अयोध्येच्या वादग्रस्त जागेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण निकालाच्या दिवशीच विश्व हिंदू परिषदेने दिल्लीत धर्म परिषद भरवली आहे.

तर दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटना तसेच मुस्लीम संघटनांनी प्रक्षोभक पत्रके वाटण्यास सुरुवात केली आहे. या सर्व बाबींची दखल घेत पोलिसांनी प्रतिबंधकात्मक पावले उचलली आहेत.

राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांचे नेते तसेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी 149 च्या नोटीसा बजावल्या आहेत.

याखेरीज दंगलीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या परिसरांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

close