ठाणे, कल्याणमध्ये डॉक्टरांचे आंदोलन

September 21, 2010 9:19 AM0 commentsViews: 3

21 सप्टेंबर

ठाणे, कल्याण, बदलापूर, मीरा भाईंदर इथल्या खाजगी डॉक्टरांनी आज एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले आहे. डॉक्टरांवर होणार्‍या वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.

यामध्ये भाईंदर मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्लस्टंट्स, मीरा रोड प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन सुद्धा सहभागी झाली आहे.

डॉक्टरांवर होणार्‍या वाढत्या हल्ल्याच्या विरोधात कायदा करण्यात आला आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे. सर्व खासगी हॉस्पिटल्समध्ये इमर्जन्सी सेवा सुरु आहेत.

पण इतर वैद्यकीय सेवा मात्र ठप्पच राहाणार आहेत. काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यामुळे पेशंट्सना फटका सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांत, केईएम, भाईंदरचे कस्तुरी मेमोरियल हॉस्पिटल, बदलापूरचे डॉ. चॅटर्जी हॉस्पिटल, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई हॉस्पिटल इथे डॉक्टरांवर हल्ले झालेले आहेत.

close