साध्वी प्रज्ञाच्या नार्को टेस्टला नाशिक कोर्टानं परवानगी दिली

October 27, 2008 12:21 PM0 commentsViews: 3

मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांसदर्भात साध्वी प्रज्ञाच्या नार्को टेस्टला नाशिक कोर्टानं परवानगी दिली आहे. मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत मदत करणा-या दोन निवृत्त लष्करी अधिका-यांसह एक मेजर आणि एका कॅप्टनला नाशिकच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. बॉम्बस्फोटामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्याच्या आरोपावरून अटक झालेल्यांना स्फोटकं मिळवून देणं, बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देणं, स्फोटांचा सराव करून घेणं अशा आरोपांखाली एटीएसनं या निवृत्त लष्करी अधिका-यांना अटक केली आहे.या प्रकरणी दुर्गा वाहिनीच्या शशिकला शास्त्री, अभिनव भारत या संघटनेचा समीर कुळकर्णी आणि संग्राम सिंग यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.या सर्वांची एटीएसकडून चौकशी सुरू आहे.

close