उत्तर प्रदेशात 500 गावे पाण्याखाली

September 21, 2010 10:29 AM0 commentsViews: 5

21 सप्टेंबर

उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमधील 500 गावे पाण्याखाली गेली आहेत. तर राजधानी दिल्लीपुढे पुराचा धोका वाढत आहे.

दिल्लीजवळच्या 80 गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत 60 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर अनेक जण बेपत्ता आहेत. सरकारने संपूर्ण राज्यात हायअलर्ट घोषित केला आहे. तर केंद्राने उत्तराखंडला आपद्ग्रस्त राज्य घोषित करावे अशी मागणी होत आहे.

रुरकी, अलमोरा आणि रामनगर या जिल्ह्यांचे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

close