चंद्रपूरमधील गणेश शिशमहल आकर्षण

September 21, 2010 10:42 AM0 commentsViews: 6

21 सप्टेंबर

चंद्रपूर येथे विविध संघटनांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे. पण यावर्षी लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे, सराफा लाईन परिसरातील रिध्दी-सिध्दी गणेश मंडळाची शिश महलातील गणेश मूर्ती. 10 फूट उंच या शिश महलातील गणेशाला पाहण्यासाठी भक्तांनी चांगलीच गर्दी केली आहे.

शांती, शक्ती, शुध्दतेचे प्रतीक असलेले महालक्ष्मी स्वरूप गजासन, श्री व्यंकटेशरूपी हाथ, देवराज इंद्राला संबोधित करणारा रत्नजडीत मुकुट, महादेवाचे नेत्रधारी तिलक श्री कृष्णासारखी चंचलता, श्री हरिविष्णूरूपी कच्छ, सौंदर्य मंडळ तारे सारखा रत्नसंगम आदी सजावट, तसेच आभाळ आणि नदीला दर्शवणार्‍या निळ्या रंगात ही मूर्ती साकारण्यात आली आहे.

मूर्तीला सजवण्यासाठी अमेरिकन डायमंडचा वापर करण्यात आला आहे. या मूर्तीच्या आजूबाजूला मूषक पहारा देत आहेत. ही मूर्ती आणि शिश महल बनविण्यासाठी इंदोर येथून मागवण्यात आले होते.

शिश महल बनविण्यासाठी चार महिने लागले असून यात 2 मिलीमीटरच्या 200 काचांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी काचांच्या 3 टन शिट्स आणि 8 बाय 4 चे 100 प्लायवूड वापरले गेले आहे.

close